Literature | भाऊराव घाडीगांवकर यांच्या ‘मोडी लिपी मंथन’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन; लिपी संवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २८.२ | रयत समाचार

(Literature) येथील ‘मोडी लिपी कट्टा मित्रमंडळ’ यांच्या वतीने ज्येष्ठ लेखक भाऊराव घाडीगांवकर लिखित ‘माझी लिपी मंथन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला. साहित्य, भाषा आणि लिपी संवर्धनाच्या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा रंगला.Literature

(Literature) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक हेमंत सामंत, प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर धाटावकर, कांचन कराई, विक्रम धाकतोडे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाची प्रत हातात घेऊन प्रकाशन केले.

(Literature) कार्यक्रमात वक्त्यांनी मोडी लिपीच्या जतन, संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या डिजिटल युगात पारंपरिक लिपींचे अस्तित्व टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘मोडी लिपी मंथन’ हे पुस्तक मोडी लिपीच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.

Literature
कांचन कराई मनोगत व्यक्त करताना

प्रकाशन सोहळ्यानंतर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांनी पुस्तकातील आशय, संशोधनाची परिपूर्णता आणि लेखकाच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचे कौतुक केले. कार्यक्रमास साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि मोडी लिपीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Literature

या सोहळ्यामुळे मोडी लिपी संवर्धनाच्या चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. माहिती व पेमेंटसाठी विनोदकुमार टेकवडे 9821651628 तर पोस्टाने पुस्तक मागवण्यासाठी तथा मदतीसाठी कमलाकर पांचाळ 9619395024 यांना संपर्क साधावा.

 

Share This Article