Politics | एफआयआर नोंदविण्यास नकार देणे अत्यंत दुर्दैवी- आ.रोहित पवार; विमान अपघातावरून राजकीय वाद तीव्र

आमदार पवार आक्रमक

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २५.२ | रयत समाचार

(Politics) कै. अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी योग्य कारवाईची प्रतीक्षा सुरू असतानाच नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) अहवालात या दुर्घटनेला VSR कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, इतक्या गंभीर निरीक्षणानंतरही अद्याप कोणताही एफआयआर दाखल न झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Politics

Contents
मुंबई | २५.२ | रयत समाचार(Politics) कै. अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी योग्य कारवाईची प्रतीक्षा सुरू असतानाच नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) अहवालात या दुर्घटनेला VSR कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, इतक्या गंभीर निरीक्षणानंतरही अद्याप कोणताही एफआयआर दाखल न झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.(Politics) या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आ. अमोल मिटकरी, आ. इद्रिस नाईकवडी आणि आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन भारतीय दंड संहिता (BNS) कायद्यानुसार FIR दाखल करण्याची मागणी केली.(Politics) याबाबत माहिती देताना आमदार पवार म्हणाले, DGCA च्या अहवालात स्पष्ट उल्लेख असतानाही पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ केली. माझा जबाब घेण्यास सुरुवात झाली होती; मात्र त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी FIR दाखल करण्यास नकार देत केवळ औपचारिकता म्हणून अर्ज स्वीकारला.आमदार पवार पुढे म्हणाले, विरोधी व सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मागणी केल्यानंतरही पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यास नकार देणे अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे सरकार आणि यंत्रणा कुणालातरी वाचवत असल्याचा संशय अधिकच गडद होत आहे. जर असेच सुरू राहिले तर अजितदादांना न्याय मिळेल का, हा प्रश्न निर्माण होतो.दरम्यान, या प्रकरणी लढा सुरूच ठेवण्याचा इशारा देत त्यांनी आज सकाळी ९ वाजता बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाऊन पुन्हा एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अजितदादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व समर्थक यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा विषय तडीस नेल्यावाचून आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.विमान अपघातप्रकरणी एफआयआर दाखल न झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Politics) या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आ. अमोल मिटकरी, आ. इद्रिस नाईकवडी आणि आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन भारतीय दंड संहिता (BNS) कायद्यानुसार FIR दाखल करण्याची मागणी केली.

 

(Politics) याबाबत माहिती देताना आमदार पवार म्हणाले, DGCA च्या अहवालात स्पष्ट उल्लेख असतानाही पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ केली. माझा जबाब घेण्यास सुरुवात झाली होती; मात्र त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी FIR दाखल करण्यास नकार देत केवळ औपचारिकता म्हणून अर्ज स्वीकारला.

 

आमदार पवार पुढे म्हणाले, विरोधी व सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मागणी केल्यानंतरही पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यास नकार देणे अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे सरकार आणि यंत्रणा कुणालातरी वाचवत असल्याचा संशय अधिकच गडद होत आहे. जर असेच सुरू राहिले तर अजितदादांना न्याय मिळेल का, हा प्रश्न निर्माण होतो.
Politics
दरम्यान, या प्रकरणी लढा सुरूच ठेवण्याचा इशारा देत त्यांनी आज सकाळी ९ वाजता बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाऊन पुन्हा एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अजितदादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व समर्थक यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा विषय तडीस नेल्यावाचून आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
विमान अपघातप्रकरणी एफआयआर दाखल न झाल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading