मुंबई | १२ जून | प्रतिनिधी
(India news) महाराष्ट्र विधानसभेतील संभाव्य निवडणूक गैरप्रकारांबाबत चौकशी करून सध्याचे सरकार तात्काळ बरखास्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.
(India news) राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात पटोले यांनी स्पष्ट केले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच महाराष्ट्रातील ८२ विधानसभा मतदारसंघांतील १२,००० हून अधिक मतदान केंद्रांवर घडलेल्या प्रक्रियात्मक अनियमिततेकडे लक्ष वेधले आहे. या अनियमिततेमुळे निवडणूक प्रक्रियेवर आणि कोट्यवधी मतांवर संशय निर्माण झाला आहे.
(India news) लोकशाहीची प्रतिष्ठा धोक्यात : “हा केवळ राहुल गांधींचा आवाज नाही, तर महाराष्ट्रातील सामान्य मतदारांची चिंता आहे. जर निवडणुकीत फेरफार झाली असेल, तर ती लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवरच गदा आहे,” असे पटोले यांनी पत्रात नमूद केले.
मुख्य मागण्या : १. निवडणुकीतील अनियमिततेवर न्यायालयीन किंवा विशेष उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी. २. चौकशी होईपर्यंत सध्याचे सरकार तात्काळ बरखास्त करावे. नाना पटोले यांनी राष्ट्रपतींना उद्देशून म्हटले की, “तुम्ही राष्ट्राचे सर्वोच्च संवैधानिक प्रमुख आहात. संविधानाच्या रक्षणासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी निर्णायक भूमिका घेण्याची हीच वेळ आहे.”
या मागणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
