नगर तालुका | प्रतिनिधी
(public issue) नगर-मनमाड मार्गावरील नागापूर चौक येथील सन फार्मा कंपनीपासून ते निंबळक हद्दीतील अपोलो कंपनीपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, सद्यस्थितीत या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, तात्काळ काम सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
(public issue) सदर रस्त्याच्या कामासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संदीप बडगे यांच्याकडे निवेदन सादर केले. या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन अनेक दिवस उलटले असूनही अद्याप ठेकेदार नेमण्यात आलेला नाही, यामुळे कामास विलंब होत असून नागरिकांचे हाल वाढले आहेत.
दररोज हजारो वाहनांची व नागरिकांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
(public issue) येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास शनिवार ता. 21 जून रोजी नागापूर-नगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी अप्पासाहेब सप्रे, ग्रामपंचायत सदस्य संजय भोर, महादेव सप्रे, नवनाथ काळे, शिवाजी दिवटे, दत्तुमामा दिवटे, छबुराव गायकवाड, बाळासाहेब कोतकर, अनिल पवार, निलेश पाडळे, रोहिदास केदार, प्रदीप बोबडे आदी उपस्थित होते.
हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
