India news | आरोही देशपांडे जेईई एडव्हॉन्स्डमध्ये देशात प्रथम

महाराष्ट्र कन्या ठरली देशाची मानकरी

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | १.६ | रयत समाचार

(India news) महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या जेईई एडव्हॉन्स्ड JEE Advanced 2026 परीक्षेत पुण्याच्या आरोही देशपांडे हिने मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

(India news) कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि उत्कृष्ट बुद्धिमत्तेच्या जोरावर आरोहीने देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक असलेल्या जेईई एडव्हॉन्स्डमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिच्या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

(India news) पुण्यातील साध्या कुटुंबातून आलेल्या आरोहीने आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा आणि मेहनत यामुळे हे यश मिळवले. तिच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
आरोही देशपांडेच्या या अभूतपूर्व यशामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून भविष्यातही ती उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
टीम रयत समाचारकडून आरोही देशपांडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading