Education | बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; सीएसआरडीमध्ये पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रम प्रवेश सुरू

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | २.६ | रयत समाचार

(Education) बारावीनंतर करिअरच्या नव्या वाटा शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध झाली असून, भास्कर पांडूरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या सीएसआरडी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क अँड रिसर्च, अहिल्यानगर येथे २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन (B.Voc.) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली, अशी माहिती संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली.

(Education) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आणि ‘ए’ ग्रेड मानांकन प्राप्त असलेल्या संस्थेमार्फत हा तीन वर्षांचा करिअर केंद्रित अभ्यासक्रम राबविला जात आहे. बारावी (HSC) उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असून प्रवेशासाठी वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे.

(Education) या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रिंट आणि डिजिटल पत्रकारिता, न्यूज रिपोर्टिंग, सोशल मीडिया कंटेंट क्रिएशन, फिल्म आणि डॉक्युमेंटरी निर्मिती, जाहिरात व जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
संस्थेने विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल ट्रेनिंग, इंटर्नशिप, फील्डवर्क, प्लेसमेंट सेल, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज मीडिया सेंटर, संगणक वाचनालय, वसतिगृह सुविधा यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यात.

संस्थेच्या माहितीनुसार, पत्रकारिता व मास कम्युनिकेशन (B.Voc.) अभ्यासक्रमासाठी एकूण ५० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली.

प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी सीएसआरडी कॅम्पस, स्टेशन रोड, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक 0241-2346328 वर अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading