Education | विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद; समाजसेवक उसगांवकर यांच्याकडून दप्तरांची भेट

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पणजी | १.६ | रयत समाचार

(Education) हेल्पिंग हँड्स फाउंडेशन, करमळी आणि समाजसेवक भालचंद्र उसगांवकर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत दप्तर (स्कूलबॅग) वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पालकांनीही समाधान व्यक्त केले.

(Education) कार्यक्रमाला उत्तर गोव्याचे उपजिल्हाधिकारी भिकू गांवस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर, सुनंदाबाई बांदोडकर, मुख्याध्यापिका रोशन आगरवाडेकर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष कुर्टीकर, समाजकल्याण खात्याचे अधिकारी देऊ गावडे, दत्ताराम तारी, मोलू वेळीप, समाजसेवक भालचंद्र उसगांवकर तसेच हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचे पदाधिकारी, स्थानिक पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Education) कार्यक्रमादरम्यान पाचवी ते दहावीपर्यंतच्या अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आकर्षक व दर्जेदार दप्तरे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी भिकू गांवस यांनी शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये आणि प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांनी वाढत्या महागाईच्या काळात अशा उपक्रमांमुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होत असल्याचे नमूद केले.
समाजसेवक भालचंद्र उसगांवकर यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका रोशन आगरवाडेकर यांनी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत शिक्षणात उत्तम प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. नवीन दप्तरे मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिदानंद मडकईकर यांनी केले. शेवटी संस्थेच्या प्रतिनिधींनी उपस्थित मान्यवर, पालक आणि नागरिकांचे आभार मानले.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading