नवी दिल्ली | २०.१ | रयत समाचार
(India news) कायदा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे प्रख्यात विधिज्ञ व शिर्डी साई संस्थानाचे कायदेशीर सल्लागार ॲड. नितीन गवारे‑पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.
(India news) ॲड. गवारे-पाटील हे मुळचे ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी यापूर्वी विविध संवेदनशील व महत्त्वाच्या प्रकरणांत प्रभावी युक्तिवाद करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा न्यायालयीन अनुभव, कायद्यावरील सखोल अभ्यास आणि प्रकरणांच्या बारकाव्यांवरील पकड लक्षात घेऊनच ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे कायदा क्षेत्रातून सांगण्यात येत आहे.
(India news) या नियुक्तीमुळे शिर्डी साई संस्थानासह राज्यातील कायदा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून ॲड. नितीन गवारे-पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे राज्यातील तरुण विधिज्ञांना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
