तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
नगर तालुका |२६ डिसेंबर | पंकज गुंदेचा
(Ahilyanagar News) अहमदनगर (नेप्ती) बायपास रस्त्यावरील सरसकट टोल वसुलीविरुद्ध स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी याबाबत अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपमहाप्रबंधक धनुश्री झोडगे यांच्याकडे मागणी केली आहे की, स्थानिकांना टोल वसुलीतून वगळावे.
(Ahilyanagar News) डॉ.पवार यांनी म्हटले आहे की, संबंधित ठेकेदार कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक टोलवसुली सुरू केली. यामुळे स्थानिक शेतकरी, मालवाहतुक, दूधव्यावसायीक, इतर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि एमआयडीसीमध्ये जाणारे कामगार यांना मोठी अडचण निर्माण झाली.
दैनंदिन जीवनासाठी या रस्त्याचा वापर करणारे नागरिकांना टोल भरावा लागणे हे अयोग्य आहे. या मुद्द्यावरून टोल नाक्यावर वारंवार वाद होतात. त्यामुळे सरसकट टोलवसुली न करता स्थानिकांना यातुन वगळण्यात यावे. जर लवकरच याबाबत योग्य निर्णय घेतला गेला नाही. तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी बी.डी.कोतकर, निलेश पाडळे यांच्यासह स्थानिक नागरीक उपस्थित होते.
उपमहाप्रबंधक धनुश्री झोडगे यांच्यासोबत चर्चा झाली असता, त्यांनी ठेकेदार कंपनीस स्थानिक नागरीकांस पासेस उपलब्ध करून देण्याच्या सुचना दिल्या आहेत.
– डॉ. दिलीप पवार
हे हि वाचा : नैतिकता : समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक – संजय सोनवणी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.