History | मंत्री लोढा यांच्या पाठबळावर मराठी आणि जैन समाज यांच्यात वाद निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे- जैन मुनी निलेशचंद्र विजय

शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून वाद

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak ShirasathPhoto Ai gen

पुणे | रयत समाचार

(History) महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या इतिहासावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यावर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी तीव्र प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहेत.

(History) जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी म्हटले, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठबळावर मराठी समाज आणि जैन समाज यांच्यात वाद निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. नयन पद्मसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नीट अभ्यासायला हवा. महाराणी ताराराणी या ठामपणे महाराष्ट्रीयन होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

(History) ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचे किंवा दिशाभूल करणारे वक्तव्य करणाऱ्यांना समाजाने ठामपणे उत्तर दिले पाहिजे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो, याचीही त्यांनी जाणीव करून दिली.
दरम्यान, या प्रकरणामुळे महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, विविध संघटना आणि राजकीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

TAGGED:
Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading