Social | महात्मा फुले द्विजन्मशताब्दी समिती स्थापन; विद्यार्थी युवकांपर्यंत फुले विचार पोहचविण्याचा निर्धार

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नाशिक | २.४ | रयत समाचार

(Social) महात्मा फुले द्विजन्मशताब्दी वर्षाची ११ एप्रिल २०२६ पासून सुरूवात होत आहे. नाशिक जिल्ह्यातील महात्माफुले यांच्या विचारावर कार्यरत कार्यकर्त्यांची बैठक हुतात्मा स्मारक नाशिक येथे आज ता.२ रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

(Social) नाशिक जिल्ह्यात महात्मा फुले विचार जागर करण्याचा व विद्यार्थी युवकांपर्यंत फुले विचार पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे अनेक सूचना मांडल्या. एकमताने महात्मा फुले द्विजन्मशताब्दी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मशाल रॅली व १० एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वा. हुतात्मा स्मारक नाशिक – छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अभिवादन करत महात्मा फुले पुतळा चौक मंडई, जुने नाशिकपर्यंत काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

(Social) यावेळी प्रास्ताविक कॉम्रेड राजू देसले यांनी केले व राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती स्थापन केली होती. त्यात विविध शिक्षणसंस्था, व्यक्ती सहभागी झाले होते. या महात्मा फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त मोठ्या संख्येने नाशिककरांनी सहभागी होऊन ‘महात्मा फुले विचार जागर करू या’ असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध उपक्रम सुचवले. समिती समन्वय संपर्क जबाबदारी जयवंत खडताळे यांच्यावर देण्यात आली. यावेळी प्रा.डॉ. अशोक पिंगळे, प्रा.श्रीकांत सोनवणे विजय राऊत, डॉ. शरद नागरे, ॲड. प्रभाकर वायचळे, शिवदास म्हसदे, अजमल खान, आप्पा जगताप, डॉ. सिल्केजा अहिरे, मिनाज मिर्झा, गौरव जगताप, मनोहर पगारे, ॲड. बंडू डांगे, सचिन चव्हाण, रामेश्वर साबळे, धोंडू मानकर आदी उपस्थित होते.

हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading