पणजी | १ एप्रिल | प्रतिनिधी
(Goa news) राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह आणखी एक मंत्री दिल्लीत दाखल झाले. मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी या सर्वांच्या केंद्रीय नेत्यांशी पुन्हा बैठका होणार असल्याचे कळते. कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
(Goa news) विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी दिल्ली दौरा करून मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी वरिष्ठ नेत्यांशी गुप्त बैठका घेतल्या. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि नाईक दोघेही दिल्लीला गेले. दोघांनाही पुन्हा मंगळवारी दिल्लीत बोलावण्यात आले. पण, त्याआधीच हे दोन्ही नेते दिल्लीत दाखल झाल्याने मंत्रिमंडळ फेरबदलाच्या प्रक्रियेला गती आल्याचे स्पष्टपणे जाणवते.
(Goa news) तीन दिवसांपूर्वी प्रुडंट वृत्तवाहिनी वरील ‘हेडऑन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते, आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येईल. एकदोन मंत्र्यांना डावलण्यात येईल, असे स्पष्ट बोलणे होते. त्यानंतर लगेचच ते दिल्लीत दाखल झाल्याने मंत्रिमंडळ फेरबदल कोणत्याही क्षणी होऊ शकतो, यावर शिक्कामोर्तब होत आहे.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770