मुंबई | २५.१२ | रयत समाचार
(Entertenment) बॉलिवूडमधील आघाडीची निर्मिती संस्था धर्मा प्रॉडक्शन्सने चित्रपट प्रदर्शन व प्रचाराच्या धोरणात मोठा आणि धाडसी बदल केला. यापुढे धर्माच्या आगामी चित्रपटांसाठी प्रि-रिलीज प्रेस स्क्रीनिंग होणार नाहीत, अशी अधिकृत घोषणा कंपनीने केली.
(Entertenment) धर्मा प्रोडक्शन्सने माध्यमांना उद्देशून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या अनेक दशकांपासून माध्यमांनी दिलेला पाठिंबा, समीक्षा आणि कव्हरेज ही संस्थेच्या यशामागील मोठी ताकद ठरली आहे. मात्र बदलत्या काळात प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्याचा अनुभव जसा कल्पित आहे तसाच अबाधित राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रि-रिलीज शो बंद करण्याचा निर्णय कठीण असला, तरी त्यामुळे चित्रपटाबाबतचा उत्साह, कुतूहल आणि सिनेमाचा अनुभव सर्वांसाठी समान राहील, असा विश्वास धर्मा प्रोडक्शन्सने व्यक्त केला आहे.
(Entertenment) मात्र माध्यमांच्या वेळेवर मिळणाऱ्या समीक्षणांचे महत्त्व मान्य करत, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशीच, दिवसाच्या पहिल्या सहामाहीत माध्यमांसाठी विशेष प्रेस स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. या स्क्रीनिंगमध्ये पत्रकार आणि समीक्षकांना सर्वप्रथम चित्रपट पाहण्याची संधी दिली जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांत माध्यमांसोबत निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याला आम्ही मोठे महत्त्व देतो आणि पुढील काळातही हे सहकार्य कायम राहील, असे धर्मा प्रोडक्शन्सने नमूद केले. निवेदनावर करण जोहर आणि अपुर्वा मेहता यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर
