सोनई | २१ नोव्हेंबर | विजय खंडागळे
Election २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी राजूर येथील रक्तनात्यातील भावजाई यांचा दशक्रिया विधी उरकून १३० किलोमिटर अंतरावर असलेल्या राजूर येथून मतदानासाठी आल्याची घटना घडली. सक्षम लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी मतदान करणे किती महत्वाचे आहे हे या घटनेतून दिसून आले. पत्रकार विजय खंडागळे यांच्या पत्नी अनिता खंडागळे यांच्या भावजयीचे निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी आणि मतदानाचा दिवस एकच आल्याने मतदानापासून वंचित राहू नये म्हणून व नातेवाईकांमध्ये पसरलेल्या दुःखाच्या प्रसंगी आपल्या नातेवाईकातून दुःख सावरून थेट १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूर येथून मतदानासाठी येऊन मतदानाचा हक्क बजावला. या प्रसंगाचं वर्णन करताना अनेक मतदार परदेशातून, राज्यातून, जिल्ह्यातून, आपला अमूल्य वेळ देऊन पवित्र मतदानाचे कार्य बजावले आहे.
पाच वर्षांतून एकदा नागरिकांना मतदानाचा हक्क मिळतो तो हक्क गमावू नये म्हणून आणि स्थानिक उमेदवार असल्याने दुःख सावरून मी मतदानाचा हक्क बजावला, असे अनिता खंडागळे यांनी सांगितले.
तसेच थेट पाडरबॉर्न, राज्य नार्थ राईन, वेस्टफालिया, जर्मनीतून येऊन कांदा व्यापारी संजय सिकची यांची कन्या श्रद्धा सिकची हिनेही Election मतदानाचा हक्क बजावला. सर्वांना भेटून मनस्वी आनंद समाधान मिळाले, अशी प्रतिक्रिया श्रद्धा सिकची यांनी रयत समाचारचे प्रतिनिधी विजय खंडागळे यांच्याकडे नोंदविली.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.