Ad imageAd image

Education : दररोजच्या माहिती देण्याच्या जंजाळातून राज्यातील शिक्षकांची मुक्तता

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीला यश- राजेंद्र निमसे

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहमदनगर | १७ जून | रयत समाचार

Education : राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांना दररोजच्या माहिती देण्याच्या जंजाळातून मुक्तता होणेकामी दिलासादायक निर्णय घेण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शिक्षण संचालक यांच्याकडेच निवेदन देऊन केली होती .या मागणीस शिक्षण आयुक्त कार्यालयाने सकारात्मकता दर्शवत आठवड्यातून फक्त शनिवारी हे अहवाल देण्याबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालनयाचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे यांच्याशी प्रत्यक्ष सविस्तर चर्चा 4 जून 2026 रोजी समक्ष निवेदन दिले होते . या निवेदनानुसारच शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह यांनी शिक्षकांना दिलासादायक अशा मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
आठवड्यातून फक्त शनिवार रोजीच्या माहिती संकलन अहवालामुळे दररोजच्या रात्री अपरात्री येणाऱ्या विविध लिंक्स -ॲप्स – पोर्टल, दररोजच्या अध्ययन अध्यापनातील वाया जाणारा वेळ ,दररोजची माहिती भरण्याची कटकट, संबंधित माहिती भरणे कामी मोबाईलची रेंज नसणे आदी बाबींमधून शिक्षकांची सुटका झाली आहे . मात्र व्हीएसके पोर्टल ,पोषण आहार दैनंदिन उपस्थिती व विद्यार्थी सुरक्षा -विधिमंडळ कामकाज व आपत्कालीन परिस्थिती संबंधित माहिती ही दररोज अथवा तातडीने देणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांच्या मार्गदर्शक सूचनांचे स्वागत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे, राज्य संघटक बाळासाहेब कदम ,संघाचे जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर, सुनील शिंदे ,विलास लवांडे, सुधीर बोऱ्हाडे , ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण, सुरेश नवले, सुधीर रणदिवे , दत्तात्रय परहर, संदीप भालेराव ,रामप्रसाद आव्हाड ,शिवाजी ढाकणे, भारत शिरसाट ,पांडुरंग देवकर, रज्जाक सय्यद, नंदू गायकवाड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनिता उदबत्ते, शिक्षक बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे आदींनी केले आहे.

हे हि वाचा :Cultural Politics | ‘वैदिकीकरण’ ही प्रवृत्ती वारंवार डोके वर का काढते आहे, संजीव सोनवणी यांचा सवाल 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading