Education | इंग्रजी शाळांच्या क्रीडा स्पर्धांचा प्रतिसाद कौतुकास्पद- डॉ. तायडे; मेस्टा नगर शहर व तालुका संघटनेचा उपक्रम

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | ०१.१२ | रयत समाचार

(Education) शहर व तालुका मेस्टा संघटनेच्या वतीने साई इंग्लिश मीडियम स्कूल, नवनागापूर येथे आयोजित आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना दहा इंग्रजी माध्यम शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंग्रजी शाळांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेले क्रीडा व्यासपीठ त्यांच्या गुणांना नक्कीच वाव देणारे ठरेल, असे प्रतिपादन मेस्टा संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.

(Education) कार्यक्रमाला राजू नगरकर, दक्षिण अध्यक्ष देविदास गोडसे, माऊंट लिट्रा स्कूलचे सुनील लोटके, मीराज स्कूलच्या सौ. बारस्कर, साई इंग्लिश स्कूलचे आदर्श ढोरजकर, माऊली स्कूल शेंडीच्या सविता वाव्हळ, लिटिल फ्लावर स्कूल खारेकर्जूनेचे नरवडे, डॉ. शरद कोलते स्कूल पारगावचे प्रा. विजय शिंदे, जीनियस ग्लोबल स्कूलचे जगदीश देशमुख, ब्ल्यू डायमंड अकॅडमीचे सुजित डोंगरे, राउ इंग्लिश मीडियम स्कूल खारेकर्जूनेच्या दीपाली झंजाड, ज्ञानदीप प्रीस्कूलचे कातोरे सर आदी विश्वस्त उपस्थित होते.

(Education) स्पर्धेत पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी बुक बॅलन्स, धावणे, रिले, फ्रॉग जंप अशा आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पदके देऊन गौरवण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. तायडे पाटील म्हणाले, मेस्टा संघटना राज्यभर शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. शहर व तालुक्यातील इंग्रजी शाळांनी अशा उपक्रमांतून सातत्याने एकत्र येणे हा संघटनात्मक दृष्टीनेही सकारात्मक पाऊल आहे. विद्यार्थ्यांसाठी हे उत्तम व्यासपीठ ठरेल.

कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय व सत्कार ॲड. सुनील लोटके यांनी केला. विश्वस्तांच्या सभेत आगामी महिन्यात सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित डोंगरे, गोरक्षनाथ नरवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विजय शिंदे यांनी मानले.

TAGGED:
Share This Article