Education | साईलता सामलेटी यांना शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती; नाशिक जिल्हापरिषदेत स्विकारणार पदभार

शिक्षणक्षेत्रातील कर्तृत्वाला मान

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

श्रीरामपूर | २.२ | सलीमखान पठाण

(Education) श्रीरामपूर तालुक्यात पूर्वी कार्यरत असलेल्या आणि सध्या नेवासा येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या साईलता सामलेटी यांची नाशिक जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) या महत्त्वाच्या पदावर पदोन्नती झाली आहे.

(Education) साईलता सामलेटी यांनी आपल्या सेवाकारकिर्दीची सुरुवात श्रीरामपूर तालुक्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून केली. गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण करत गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर नेवासा, संगमनेर व श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये त्यांनी प्रशासकीय शिस्त, शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षक-विद्यार्थी हितासाठी उल्लेखनीय कार्य केले.

(Education) सेवाज्येष्ठता व शासनाच्या नियमांनुसार त्यांच्या कार्याची दखल घेत नाशिक जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारीपदी (प्राथमिक) त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
साईलता सामलेटी यांच्या या यशाबद्दल शिक्षणक्षेत्रातील अधिकारी, शिक्षक, सहकारी व विविध सामाजिक स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Womens Power: वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading