घोटण | २२ सप्टेंबर | शिवाजी घुगे
Education शेवगाव तालुक्यातील घोटण येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयामध्ये पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३७ व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व दांडिया नृत्याचे मनमोहक प्रात्यक्षिक सादर केले. गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले तसेच ठिकठिकाणी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य नाना पा. मोटकर, विठ्ठलराव घुगे, लक्ष्मणराव टाकळकर, घोटण‘चे विद्यमान सरपंच प्रकाश घुगे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू घुगे, घोटण सहकारी सोसायटीचे चेअरमन भारतराव मोटकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश निकम, उपाध्यक्ष महादेव मोटकर, केदारेश्वर साखर कारखान्याचे संचालक रणजीतराव घुगे, माजी सरपंच कुंडलिकराव घुगे, शहादेव घुगे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष शिवाजीराव टाकळकर, परमेश्वर थोरवे, योगेश मोटकर, संदीप फुंदे, हरी ढाकणे, नितीन आव्हाड, मनोज भोसले, नवनाथ वणवे, प्राचार्य संदीप घुगे, आदेश घुगे, पीरमहंमद शेख, अरुण घुगे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीरितेसाठी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गलांडे टी.व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली खाटीक एस.वाय., ढाकणे एम.के., शिंदे जी.डी., गरड एन.एन., घुगे टी.के., आंधळे एस.यु., बडधे एन.बी., तांबे जी.टी., तांदळे ए.ए., घुगे एस.के., आघाव एस.टी., कुमारी दौंड ए.एस., तोगे ए.ए., मोरे ए.एल., चेडे बी.एस. यांनी सहकार्य केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.