Cultural Politics: युवानेतृत्व किरण बनसुडे यांच्या जन्मदिनानिमित्त ‘झाडे लावा, झाडे जगवा’ उपक्रम

78 / 100 SEO Score

उपक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

श्रीगोंदा | ३० नोव्हेंबर | गौरव लष्करे

Cultural Politics येथील सावतानगर परिसरात जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने प्रा.देवकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेतृत्व किरण बनसुडे यांच्या जन्मदिनानिमित्त ‘झाडे लावा, झाडे जगवा’ उपक्रम हाती घेण्यात आला. बाबुर्डीरोडच्या बाजूस करंजी, जांभूळ या प्रकारचे अनेक झाडांची लागवड करण्याचे आणि त्याची जपणूक करण्याचे काम किरण बनसुडे यांनी हाती घेऊन, तरुणांमध्ये आदर्श उभा केला.

Cultural Politics वृक्षारोपण प्रसंगी किरण बनसुडे यांनी सांगितले, मला माझ्या गावातील परिसर निसर्गाच्या सानिध्यात असावं, लोकांना निसर्गाचे महत्व कळावे आणि लोकांनीसुद्धा झाडांची जपवणूक करावी. थोडा वेळ काढू आपल्या घराजवळील झाडांना पाणी, खत देण्याचे प्रयत्न करावे.
उपक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रा.देवकर सर, नवनाथ दरेकर, बाळासाहेब काकडे, समीर नागवडे, माधव बनसुडे, अप्पासाहेब डोके, ज्ञानदेव बनसुडे, अभिषेक बनसुडे, राजू बनसुडे, दत्तात्रय बनसुडे, सागर खेतमाळीस, राम खेतमाळीस आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *