Crime | शेख यांच्या उपोषणाला यश; कबाडी विरोधात चौकशीचा मार्ग मोकळा; आयजी कराळे यांचा लेखी आदेश

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १६.४ | रयत समाचार

(Crime) अहिल्यानगर पोलीस मुख्यालयातील अंमली पदार्थ साठवणूक केंद्रातून अल्प्राझोलम या अंमली पदार्थाच्या अपहार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याविरोधात चौकशी व कारवाईचा मार्ग अखेर मोकळा झाला. सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांच्या उपोषणामुळे प्रशासनाला झुकावे लागले असून, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी यासंदर्भात लेखी आदेश देत कारवाईचे आश्वासन दिले.

(Crime) या प्रकरणात शेख यांनी यापूर्वीच राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार करून कबाडी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच १५ एप्रिलपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, नगरचे पोलीस अधीक्षक यांनी १५ एप्रिल रोजी चौकशी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविल्याचे पत्र शेख यांना दिले होते. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने शेख यांनी १६ एप्रिल रोजी नाशिक येथे उपोषण सुरू केले.

(Crime) या उपोषणाची गंभीर दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी शेख यांच्याशी थेट चर्चा करून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर किरणकुमार कबाडी यांच्याविरोधात चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे लेखी आदेश देण्यात आले.
प्रशासनाच्या या आश्वासनानंतर शेख यांनी उपोषण स्थगित केले. मात्र, कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading