Business | कीर्तनकार ‘बनण्याची’ सुवर्णसंधी; डॉ. चारूदत्ताबुवा आफळे यांचा ऑनलाईन कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग चालू

SubEditor | Dipak Shirasath

पुणे | १६.४ | रयत समाचार

(Business) कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून ‘समाजप्रबोधन’ची परंपरा जपण्यासाठी इच्छुकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ह.भ.प. डॉ. चारूदत्ताबुवा आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाईन कीर्तन प्रवचन अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम सोमवारी ते शुक्रवारी दररोज सकाळी ८ ते ९.१५ या वेळेत झूम प्लॅटफॉर्मद्वारे होणार असून, इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने सहभागी होता येणार आहे.

(Business) अभ्यासक्रमामध्ये कीर्तन परंपरेचा इतिहास, संतचरित्रांचा सखोल अभ्यास, संत वाङ्मयाचा परिचय, तसेच देशभरातील विविध कीर्तन परंपरांची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, प्रमुख पाच कीर्तन पद्धतींचे सादरीकरण तंत्र, पूर्वरंग-उत्तररंगासह कीर्तन प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे टप्पे शिकवले जाणार आहेत.

(Business) प्रवचनासाठी आवश्यक वकृत्वकला, संभाषण कौशल्य, कथाकथन यांची तंत्रे तसेच कंठसंगीताची मूलभूत माहिती यावरही मार्गदर्शन होणार आहे. टाळ, मृदंग, वीणा, तबला, पेटी यांसारख्या वाद्यांची ओळख करून देत, अभ्यासग्रंथांचे मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
१५ वर्षांवरील कोणत्याही स्त्री-पुरुषांसाठी हा अभ्यासक्रम खुला असून, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, अभियंते, निवृत्त अधिकारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती, तसेच अध्यात्म व समाजकार्यात रुची असलेल्या सर्वांसाठी ही संधी उपयुक्त ठरणार आहे.
अभ्यासक्रमासाठी स्टडी मटेरियल आणि रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पुणे येथे प्रत्यक्ष मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी सोबतच्या लिंकवर भेट द्यावी – https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/kirtanvarg⁠ अधिक माहितीसाठी 7066250282 / 7066250363 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
कीर्तनविश्व कार्यालय, विश्व मराठी परिषद, डेक्कन जिमखाना, पुणे येथे या उपक्रमाचे समन्वयन केले जात आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading