Business | ‘प्रॉम्प्ट सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस’ला सलग दुसऱ्या वर्षी Highest Growth Distributor Award; अहिल्यानगरच्या औद्योगिक क्षेत्राला राष्ट्रीय मान्यता

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ५.३ | रयत समाचार

(Business) औद्योगिक मशीनरीसाठी उच्च दर्जाच्या बेअरिंगची निर्मिती करणाऱ्या जगप्रसिद्ध बहुराष्ट्रीय एसकेएफ (SKF) कंपनीकडून अहिल्यानगरमधील प्रॉम्प्ट सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस या औद्योगिक वितरक संस्थेला सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील Growth Distributor of the Year 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे अहिल्यानगरच्या औद्योगिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

(Business) सन २०२५ मध्ये प्रॉम्प्ट सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेसने एसकेएफच्या बेअरिंग विक्रीत तब्बल २० पट वाढ साध्य करत देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली. या विक्रमाची दखल घेत एसकेएफ कंपनीने त्यांना सर्वोच्च विक्री वाढीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला.

(Business) हा पुरस्कार बंगळुरू येथे आयोजित एसकेएफच्या देशभरातील डिस्ट्रीब्युटर्स व डिलर्सच्या स्नेहमेळाव्यात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रॉम्प्ट सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेसचे संचालक प्रमोद विजय कंगे यांना प्रदान करण्यात आला. प्रॉम्प्ट सेल्सच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रभावित होऊन एसकेएफ कंपनीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठीही डिस्ट्रीब्युटरशिपची जबाबदारी त्यांच्या कंपनीकडे सोपवली आहे.

प्रमोद कंगे यांनी सांगितले, १९०७ पासून बेअरिंग उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या एसकेएफ कंपनीची उत्पादने जगातील १३० हून अधिक देशांमध्ये वापरली जातात. दर्जेदार उत्पादन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह सेवा यामुळे या कंपनीने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला आहे.
मागील अडीच वर्षांपासून प्रॉम्प्ट सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेसकडे अहिल्यानगर जिल्ह्याची अधिकृत डिस्ट्रीब्युटरशिप आहे. यापूर्वी काहीजण एसकेएफचे वितरक असल्याचे भासवून कंपनीच्या नावाखाली चीनी बनावटीच्या बनावट बेअरिंगची विक्री करत होते. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांची फसवणूक होत होती.

प्रॉम्प्ट सेल्सने अधिकृत वितरक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उद्योगक्षेत्रात विश्वासार्हता निर्माण करण्यावर भर दिला. एसकेएफच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून खरे आणि बनावट उत्पादन कसे ओळखावे याबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांचा विश्वास वाढला आणि विक्रीत अभूतपूर्व वाढ झाली.

देशातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात २० पट विक्री वाढ होणे हा मोठा विक्रम असल्याचे कंगे यांनी सांगितले. ‘हा पुरस्कार आमचा नसून अहिल्यानगरच्या औद्योगिक क्षेत्राचा सन्मान आहे. प्रामाणिकपणा आणि सचोटीने काम केल्यास मोठे यश मिळू शकते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या यशामध्ये अहिल्यानगर एमआयडीसीतील उद्योजक, ‘आमी’ संघटना आणि टीएलसी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, प्रॉम्प्ट सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेसकडे एल अ‍ॅण्ड टी इवाक, रेनॉल्ड चेन्स, कार्बोरंडम युनिव्हर्सल, गल्फ ऑईल, अरनो जर्मनी, ड्युमेल जर्मनी आणि सुप्रॉन वेल्डिंग अलॉयज यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचीही डिस्ट्रीब्युटरशिप आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading