मुंबई | ५.३ | रयत समाचार
(Education) नवोदित लेखक, कवी आणि डिजिटल प्रकाशनात रस असलेल्या व्यक्तींना ई-बुक प्रकाशनाचे संपूर्ण मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने विश्व मराठी परिषद यांच्या वतीने ‘ॲमेझॉन किंडल- ईबुक निर्मिती’ या चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते २० मार्च २०२६ दरम्यान दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत Zoom माध्यमातून आयोजित केली जाणार आहे.
(Education) अनेक नवोदित लेखक व कवींना स्वतःचे पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा असते; मात्र योग्य मार्गदर्शन, वेळ आणि प्रकाशनाचा खर्च यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते. या पार्श्वभूमीवर ॲमेझॉन किंडल प्लॅटफॉर्मवर ई-बुक तयार करून ते स्वतः प्रकाशित करण्याची संपूर्ण प्रक्रिया या कार्यशाळेत शिकविण्यात येणार आहे. सहभागी व्यक्तींना ई- बुक निर्मिती, कव्हर डिझाईन, लेआउट, प्रकाशन आणि विपणन याबाबत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळणार आहे.
(Education) कार्यशाळेत किंडल डायरेक्ट पब्लिशिंग (KDP) ची ओळख, खाते उघडण्याची प्रक्रिया, ई-बुकचा फॉरमॅट, अनुक्रमणिका तयार करणे, योग्य फॉन्टची निवड, किंडलवर पुस्तक प्रकाशित करणे, ई-बुकची किंमत ठरविणे तसेच रॉयल्टीद्वारे उत्पन्न कसे मिळवायचे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
कार्यशाळेला लेखक, कवी, फ्रीलान्सर, उद्योजक तसेच डिजिटल प्रकाशन क्षेत्रात रस असलेले सर्वजण सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेसाठी प्रसाद कृष्णराव नातु हे लेखक, व्यवसायिक ब्लॉगर आणि युट्युबर मार्गदर्शन करणार असून त्यांची कथासंग्रह, कादंबऱ्या आणि कवितासंग्रह मिळून १६ पुस्तके किंडलवर ई-बुक स्वरूपात प्रकाशित झाली आहेत.
या कार्यशाळेचे सहभाग शुल्क ७९९ रुपये असून सर्व सहभागींना ई- प्रमाणपत्र आणि कार्यशाळेचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे. इच्छुकांनी मर्यादित प्रवेश असल्याने लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी :
https://vishwamarathiparishad.graphy.com/courses/ebook
अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक प्रा. अनिकेत पाटील यांना 7507207645 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
