अहमदनगर | ९ जानेवारी | प्रतिनिधी
(latest news) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्त रविवारी ता. १२ जानेवारी रोजी केडगाव येथे जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी दिली.
जिजाऊ महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक किसन सातपुते यांची निवड करण्यात आली.
(latest news) १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून युवक – तरुणांना प्रेरणा देण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, राज्य पुरस्कारप्राप्त लेखक नितीन थोरात, लेखक देवा झिंजाड, उद्योजक राजेंद्र शिंदे हे मार्गदर्शन करणार असून पद्मश्री पोपट पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख सचिन चोभे यांनी दिली.
रविवार ता. १२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. मार्गदर्शनपर व्याख्यान सुरू होईल. तरी अधिकाधिक युवक, तरुण आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महादेव गवळी यांनी केले.
हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर