Mumbai News: 100% महिला साक्षर असलेल्या प्रगत केरळ राज्याला मीनी पाकिस्तान म्हणून वक्तव्य करणाऱ्या राणेंचा दिवट्या नितिशला बडतर्फ करा - Rayat Samachar

Mumbai News: 100% महिला साक्षर असलेल्या प्रगत केरळ राज्याला मीनी पाकिस्तान म्हणून वक्तव्य करणाऱ्या राणेंचा दिवट्या नितिशला बडतर्फ करा

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

रयत समाचार वृत्तसेवा
उपसंपादक : दिपक शिरसाठ

मुंबई | २ जानेवारी | प्रतिनिधी

(Mumbai News) राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नितेश राणे याने केरळ राज्य मिनी पाकिस्तान आहे म्हणून तेथून राहुल गांधी व प्रियांका गांधी निवडून येतात अशी गरळ ओकत बेताल वक्तव्य केले. केरळ राज्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्याची राणेची लायकी नाही. राज्याचा मंत्री या संविधानिक पदावर असलेल्या राणेचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, बडतर्फ करण्यात यावे.

(Mumbai News) केरळ राज्य हे देशातील राजकीय दृष्ट्या अतिशय सजग व प्रगत राज्य आहे. १०० टक्के साक्षर व डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर असलेल्या केरळ राज्याची कोरोना काळात आरोग्य सेवेसाठी ‘केरळ पॅटर्न’ म्हणून देश व जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली होती, देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणारे, पर्यटन विकासासाठी आघाडीवर असणाऱ्या तसेच १००% महिला साक्षर असलेल्या अशा राज्याला मीनी पाकिस्तान म्हणून केरळच्या व भारतीय जनतेचा अपमान केला आहे.

(Mumbai News)भाजपाने राणे कुटुंब धार्मिक तेढ वाढवून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नेमलेले ‘घरगडी’ आहे की काय? राणेंचा दिवटा नितेश सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे. नितेश राणेचे वक्तव्य केवळ निषेधार्ह नसून भारतीय संघराज्याची प्रतिमा खराब करणारे दोन समाजात तेढ निर्माण करणारे असल्याने राणेंवर खटला दाखल करण्यात यावा व ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे, अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.
(Mumbai News) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे

 

हे हि वाचा :Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Share This Article
Leave a comment