कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याताई गोबरे
पाथर्डी | ३ जानेवारी | पंकज गुंदेचा
(ahilyanagar news) तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याताई गोबरे मंचावर उपस्थित होत्या. विद्यार्थीनी अवनी लवांडे तसेच सुदिक्षा राजळे यांनी महिला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका सावित्रीमाई यांच्या जीवनपटावर भाषण केले.
(ahilyanagar news) यावेळी शिक्षिका राजश्री दुशिंग यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. कार्यक्रमास मुख्याध्यापक गोरखनाथ रेपाळे, कीर्ती भांगरे, मनीषा जाधव, मंगल लवांडे, तबस्सूम शेख, जयश्री वाघमोडे तसेच शिक्षक विजय भताने, राजेंद्र वांढेकर, अमोल लवांडे, सचिन पवार, अभयसिंह चितळे, प्रशांत अकोलकर, संजय आठरे व संजय शिंदे आदी उपस्थित होते.
लवांडे शिवाजी यांनी प्रास्ताविक केले यावेळी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
- हे ही वाचा : मराठी विश्वकोश येथे वाचा