२०,०००/- डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात नक्की किती? सामान्य माणसाचा प्रश्न
नवी दिल्ली | ४ जानेवारी | प्रतिनिधी
(india news) केंद्रीय माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी प्रधानमंत्री कार्यालयास माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना भेटस्वरूप दिलेल्या हिऱ्याची किंमत किती होती? त्यावर ‘द्विपक्षीय संबंध खराब होतील या कारणाने ही माहिती देऊ शकत नाही,’ असे उत्तर केंद्र सरकारने दिले.
(india news) आता जो बायडेन यांचा कार्यकाळ संपत आला असताना त्यांना अध्यक्षपदावर असताना मिळालेल्या भेटवस्तूंची यादी आणि त्यांची किंमत जाहीर केली. त्यानुसार नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी श्रीमती बायडेन यांना दिलेल्या ७.५ कॅरेटच्या हिऱ्याची किंमत तब्बल २०,००० डॉलर्स इतकी असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे कोणत्याही परदेशी पाहुण्याने अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ला दिलेली ही सर्वात ‘महागडी’ भेटवस्तू आहे.
सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत, म्हणजे मोदी प्रधानमंत्री होईपर्यंत, पूर्वीचे प्रधानमंत्री परदेशी भेटवस्तू देताना त्यामध्ये ‘भारतीय संस्कृती’ दिसेल अशा वस्तू, पुस्तके, हस्तकलेच्या वस्तू आदी वस्तूंची निवड करत असत.
मोदींचे शौकच निराळे आहेत, अशी चर्चा देशभर होत आहे. ‘पूर्वजांनी कमवायचं आणि दिवट्याने उधळायचं’ अशी म्हण महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याची आठवण अनेकांनी काढली.
स्त्रोत : https://www.facebook.com/share/18aq2reETi/
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
Letter of Rti Activist Ajay Bose