Politics: बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या - आ. विक्रम पाचपुते - Rayat Samachar

Politics: बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या – आ. विक्रम पाचपुते

रयत समाचार वृत्तसेवा

बबनराव पाचपुते वनमंत्री असताना बिबट्या दिसताच पिंजरा लावण्यात येत होता

श्रीगोंदा | २१ डिसेंबर | माधव बनसुडे

Politics नागपुर येथे हिवाळी अधिवेशन चालू आहे श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी यावेळी शेतकरी हिताची मागणी करुन सभागृहाचे लक्ष वेधले.

Politics श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात सिंचनक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने ऊसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. महावितरणकडून रात्रीची लाईट असल्याने शेतकऱ्यांना ऊसाला पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागते. मतदारसंघात ऊसाच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी बिबट्यांच्या वावर वाढला आहे. त्यांच्या अनेक दिवसांपासून माणसांप्रमाणेच जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

बबनराव पाचपुते वनमंत्री असताना बिबट्या दिसताच पिंजरा लावण्यात येत होता. मात्र आता वनविभाग पिंजरे लावु शकत नसतील तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आ. विक्रम पाचपुते यांनी केली.Politics

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Share This Article
Leave a comment