Ahilyanagar News: भारतीय सेनेच्या २२ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनचा 'हिली डे' साजरा - Rayat Samachar
Ad image

Ahilyanagar News: भारतीय सेनेच्या २२ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनचा ‘हिली डे’ साजरा

७१ च्या लढाईमधील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

नगर तालुका | २१ डिसेंबर | प्रतिनिधी

(Ahilyanagar News) तालुक्यातील पिंळगांव माळवी येथील साई रिसॉर्ट येथे ता.८ डिसेंबर रोजी भारतीय सेनेची २२ मराठा लाईट इन्फन्ट्री (हैद्राबाद) बटालियनच्या ‘हिली डे’ निमित्त निवृत्त अधिकारी, ज्युनिअर कमिशन ऑफिसर, जवान, ७१ वॉर हिरो आणि त्यांचे परिवार एकत्र येऊन गेट टुगेदर कार्यक्रम साजरा केला.

(Ahilyanagar News) प्रथम दीप प्रज्वलन करून ७१ च्या लढाईमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Ahilyanagar News
छायाचित्र : एक्स्प्रेस फोटो, अहमदनगर
कार्यक्रमासाठी कर्नल एस.एस.नांगरे, कर्नल सोमेश्वर गायकवाड, कॅप्टन शेख बुढण, कॅप्टन शेख बशीर, कॅप्टन के.के.पठाण, सुभेदार मेजर नारायण झिने, सुभेदार शेख नवाब, सुभेदार माणिक शिंदे, सुभेदार शरीफ, सुभेदार मेजर दिनकर तांदळे, सुभेदार शेख बहादूर पटेल, हवालदार शिवाजी लोंढे, हवालदार रतन साके, हवलदार आबा मूलक, हवालदार मोहन म्हस्के, दिलीप काकडे, बाळासाहेब यादव, सुरेश मोटे, कैलास काळे, बबन नाईक, नाना दरेकर, राजू ठोकळ, दिनकर जाधव, बद्रुद्दिन शेख, शेख अहमद, मणियार धनायेत, सचिन पवार, लतिफ इनामदार आदी सैनिक सहकुटुंब सहभागी झाले होते.

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment