Christmas 2024: ख्रिसमस विशेषांकासाठी लेख, कविता आदी साहित्य २३ डिसेंबरपर्यंत पाठवावे; टीम रयत समाचारचे आवाहन - Rayat Samachar
Ad image

Christmas 2024: ख्रिसमस विशेषांकासाठी लेख, कविता आदी साहित्य २३ डिसेंबरपर्यंत पाठवावे; टीम रयत समाचारचे आवाहन

Image : https://www.britannica.com/topic/Christmas

ख्रिसमससंबंधी लेख, कविता आदी साहित्य रयत समाचारच्या 8805401800 या व्हाट्सअप क्रमांकावर व [email protected] या ईमेलवर पाठवावे

अहमदनगर | २० डिसेंबर | दिपक शिरसाठ

(Christmas 2024) दैनिक रयत समाचारच्या वतीने यंदा बुधवारी ता.२५ डिसेंबर रोजी ‘ख्रिसमस विशेषांक’ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी आपले लेख, कविता आदी साहित्य सोमवारी ता.२३ डिसेंबरपर्यंत पाठविण्याचे टीम रयत समाचारच्यावतीने आवाहन करण्यात आले.

(Christmas 2024) अहमदनगर आणि ख्रिश्चन धर्मियांचे नाते अतुट आहे. जगभरातील अमेरिका, जर्मन, ब्रिटन आदी ख्रिश्चन मिशनरींनी येथे परिर्वतनाचे कार्य केलेले आहे. आरोग्य, शेती, धर्म, शिक्षण, पर्यावरण, स्त्रियांची सर्वांगिण उन्नती आदींसह अनेक क्षेत्रातील बहुजनांसह स्त्रियांची प्रगती याच धर्मियांमुळे झालेली असून हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अहमदनगरची ‘गंगा जमुनी संस्कृती’ जगभर प्रसिद्ध आहे. येथे सर्व धर्मिय गुण्यागोविंदाने नांदत आलेले आहेत. बहुजनांच्या शैक्षणिक प्रगतीचा मार्ग तात्कालिन ख्रिश्चन धर्मियांमुळे खुला झाला. त्यामुळे जिल्हाभरातील जनतेची विविध क्षेत्रात प्रगती झाली.

ख्रिसमस तथा नाताळ हा सण अहमदनगरमधे फार पुर्वीपासून सुरू आहे. येथील पहिला ख्रिसमस अंदाजे १८३३ साली गॉर्डन चर्च येथे साजरा झाला असे जुने लोकं सांगतात. या चर्चपुर्वी येथे स्थानिक भजनी मंडळी एकत्र येवून येशूची भजने म्हणत असत.
रयत समाचारचा ‘ख्रिसमस विशेषांक’ बुधवार ता.२५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होत आहे. यासाठी आपले ख्रिसमससंबंधी लेख, कविता आदी साहित्य रयत समाचारच्या 8805401800 या व्हाट्सअप क्रमांकावर व [email protected] या ईमेलवर ता.२३ पर्यंत पाठवावे. लेख अंदाजे ३००-४०० शब्द मर्यादेपर्यंत असावा. कविता स्वत:ची रचना असावी, असे आवाहन टीम रयत समाचारच्या वतीने करण्यात आले आहे.
Christmas 2024
https://christmasify.com/birth-of-jesus-christ/

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment