Politics महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रा. राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल आदी सहकारी उपस्थित होते.