स्काऊटस् ने केला ‘खरीकमाई’ सेवा महोत्सव
श्रीगोंदा | १७ डिसेंबर | सचिन झगडे
येथील रयत Education संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये बाल आनंद मेळावा व खरीकमाई सेवा महोत्सव संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य कुंडलिक दरेकर, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता चौधरी, बापूराव औटी, पीटर रणसिंग, केंद्रप्रमुख उत्तरेश्वर मोहोळकर, प्राचार्य दिलीप भुजबळ, विस्तार अधिकारी कृष्णा धुमाळ, पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे व विविध समित्यांचे सदस्य व पालक यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
श्रमप्रतिष्ठा व केलेल्या श्रमाचा योग्य तेवढाच मोबदला घ्यावा ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी स्काऊट व गाइडच्या माध्यमातून खरी कमाई केली जाते. ता.१० डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत राज्यभरात सेवा महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांना ‘खरी कमाई’द्वारे श्रमाच्या तत्त्वांची शिकवण Education दिली जात आहे.
बालआनंद मेळाव्यामध्ये एकूण ८५ स्टॅाल होते. घरी तयार केलेले विविध रुचकर –स्वादिष्ट खाद्य पदार्थ, फनी गेम्स, फळे, भाज्या, लहान खेळणी यांचा समावेश होता. या मेळाव्यात एक लाखाहून अधिक रुपयांची उलाढाल बालगोपाळांनी केली. यातूनच भविष्यातील उद्योजक घडावेत हा उद्देश असल्याची माहिती विभाग प्रमुख आरती गांगर्डे-खोसे यांनी दिली.
या बालआनंद मेळावा व खरीकमाई सेवा महोत्सव नियोजन स्काऊट मास्टर विकास लोखंडे, विभाग प्रमुख आरती गांगर्डे, सुवर्णा शेलार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद, कर्मवीर भाऊराव पाटील पथकातील संघनायक आर्यन आवचर (मोर संघ), जैद जकाते (वाघ संघ), तोहीद पठाण (घोडा संघ), राजहंस घोडके (गरुड), सिद्धार्थ थोरात (चित्ता), सम्राट घोडके (सिंह संघ) व सर्व ९ वी मधील स्काऊटस् यांनी केले.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर