पत्रकारांची अधिस्वीकृती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना व विकास पत्रकारीता याविषयी मार्गदर्शन
अहमदनगर | १६ डिसेंबर | दिपक शिरसाठ
Ahilyanagar News नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती, जिल्हा माहिती कार्यालय आणि सीएसआरडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पत्रकारांची अधिस्वीकृती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना व विकास पत्रकारीता’ या विषयावर सीएसआरडी महाविद्यालय, अहमदनगर येथे ता.१७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पत्रकारांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीचे विजयसिंह होलम, किरण लोखंडे, अभिजीत कुलकर्णी आणि चंदन पुजाधिकारी यांनी दिली.
Ahilyanagar News सीएसआरडी महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य प्रकाश कुलथे व नवनाथ दिघे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभारी उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे तसेच नाशिक विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके हे मार्गदर्शन करणार आहेत.
पत्रकारांनी या महत्वाच्या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन नाशिक विभाग अधिस्वीकृती समितीचे सदस्य, जिल्हा माहिती कार्यालय तसेच सीएसआरडी महाविद्यालय यांच्याकडून करण्यात आले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा