प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांना वाहण्यात आली श्रध्दांजली
अहमदनगर | २८ डिसेंबर | प्रतिनिधी
(Politics) अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी येथे रा.स्व.संघाच्या भारतीय जनता पक्षाचे नियोजित प्रदेश अधिवेशन १२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. अधिवेशनाची शिर्डीत जय्यत तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती कृष्णा व गोदावरी खोरे महामंडळाचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमावर ‘कोअर टीम’च्या बैठकीचे छायाचित्र प्रसारीत केले. यामधे आमदारांना ‘रिसिव्ह’ करताना काही ‘अधिकारी’ दिसून येत आहेत.
(Politics) महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या ‘कोअर टिम’ची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस भाजपाचे आमदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सत्कार टाळून माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांना श्रध्दांजली वाहण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदविणे
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
सरकारी अधिकारी यांनी कोणत्याही पक्षाच्या ‘कोअर टीम’ च्या बैठकीस जावे की जावू नये ? नागरिकांनी कळवावे.