शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी ता.२८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५
श्रीरामपूर | २७ डिसेंबर | सलीमखान पठाण
(Ahilyanagar News) येथील अँकर्स असोशिएशनच्या वतीने श्रीरामपूर शहरात प्रथमच शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी ता.२८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान वक्तृत्व, निवेदन व सूत्रसंचालन संदर्भात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष प्रा.ॲड. आदिनाथ जोशी यांनी दिली.
(Ahilyanagar News) कार्यशाळेचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी तथा कम्युनिटी रेडीओ प्रमुख डॉ. आनंद चवई यांच्या हस्ते तर कथाकथनकार व व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे प्रमुख उपस्थितीत समारोप तसेच बहारदार व्याख्यान होणार आहे. व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे.
कार्यशाळेत भाषण कसे करावे, संभाषण कसे करावे? संकलन कसे करावे?, नियोजन व निवेदन कसे करावे? या संदर्भात प्रा. ज्ञानेश गवले, सलीमखान पठाण, संतोष मते, प्रसन्न धुमाळ, संगिता फासाटे, ॲड. प्रवीण जमदडे आदी मार्गदर्शन करणार आहे.
मुंबई, पुण्यासारख्या महानगरात अशा कार्यशाळा होतात पण ग्रामीण भागातील गुणवंताना याचा लाभ व्हावा, यासाठी आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत सहभाग नोंदवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. सतीश म्हसे, विलास कुलकर्णी, ॲड. अजय चौधरी, राजेंद्र हिवाळे, दिलीप साळुंके, शीतल गुंजाळ, मधुवंती धर्माधिकारी, प्रियंका यादव, अवधूत कुलकर्णी आदी सदस्यांनी केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदविणे
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
कार्यशाळेस हार्दिक शुभेच्छा