Public Issue: श्रीरामपूरकरांनो, दोन दिवस पाणी जपून प्या; दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण; 'आचारसंहिते'मुळे पाणी सोडण्यास पाटबंधारे'कडून उशीर - Rayat Samachar

Public Issue: श्रीरामपूरकरांनो, दोन दिवस पाणी जपून प्या; दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण; ‘आचारसंहिते’मुळे पाणी सोडण्यास पाटबंधारे’कडून उशीर

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
70 / 100

श्रीरामपूर | २५ नोव्हेंबर | सलीमखान पठाण

Public Issue शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गोंदवणी परिसरातील दोन्ही साठवण तलावातील पाणी जवळजवळ संपले असून सध्या तळामध्ये असलेल्या पाण्याचा पुरवठा शहरवासीयांना केला जातोय. कमी वेळ होणाऱ्या या पाण्यामध्ये दुर्गंधीचे प्रमाण खूप असून पाण्याचा रंग देखील बदलला आहे. लहान मुले उलटीजुलाबाने आजारी पडली आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय वेळेत न झाल्याने शहरातील नागरिकांवर दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची नामुष्की आल्याचे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील चर्चेतून दिसून आले.

Public Issue काल दुपारी निळवंडे धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले असून ते उद्या सायंकाळपर्यंत तलावात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवसांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी माहिती नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता निलेश बकाल यांनी दिली.

शहरातील सर्वच भागामध्ये नळांना दुर्गंधीयुक्त लालसर पाणी आले. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी पाण्याचे फोटो तसेच पाणी दुर्गंधीयुक्त असल्याचे पोस्ट टाकल्या. शहरातील सर्वच भागामध्ये Public Issue  असे पाणी आल्याने याबाबत पाणीपुरवठा विभागाचे निलेश बकाल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, तलावातील पाणीसाठा संपला. तळ्यातील पाणी सध्या सोडले जात आहे. त्यामध्ये निर्जंतुकी करण्यासाठी जी औषधे वापरली जातात त्याचे प्रमाण ठरलेले आहे. प्रमाणापेक्षा जास्त औषधे वापरल्यास नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागू नये म्हणून ती रिस्क आपण घेत नाही. आचारसंहितेमुळे पाणी सोडण्यास पाटबंधारे खात्याकडून उशीर झाला. परंतु काल दुपारी पाणी सोडण्यात आले ते उद्या संध्याकाळपर्यंत तलावात येईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे पूर्ण वेळ, पूर्ण दाबाने स्वच्छ पाणी पुरवठा होईल. याबाबत नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी देखील पाटबंधारे खात्याशी संपर्क साधून लवकरात लवकर पाणी सोडण्याची विनंती केली. दरम्यान दोन दिवसापासून शहरातील नळांना कुठे पिवळसर तर कुठे लालसर रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी नळामार्फत येत आहे. त्यामुळे लहान मुलांना बाधा होऊन उलट्या आणि जुलाबाचे पेशंट वाढले. काही नागरिक हे बॉक्समधील बाटलीबंद पाणी पीत आहेत. एखादी जलवाहिनी फुटून त्यामध्ये मातीमिश्रित पाणी गेले की काय अशी शंका व्यक्त केली जात होती परंतु पाणीपुरवठा विभागाशी संपर्क केल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली.
नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याबाबत पाटबंधारे खात्याशी संपर्क ठेवून दोघांनी मिळून पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. रोटेशन लांबल्याने शहरवासीयांवर ही वेळ आली परंतु पिण्याच्या पाण्याला देखील जर आचारसंहितेचा बडगा दाखवला जात असेल तर ही दुर्दैवी बाब असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. भविष्यात शहरातील पाणीसाठा संपण्याअगोदरच तलावामध्ये पाटबंधारे खात्याने पाणी सोडावे, अशी मागणी देखील नागरिकांनी केली.
दोन दिवस तलावातील तळ्यातील पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाणी उकळून प्यावे तसेच लहान मुलांची काळजी घ्यावी. नवीन पाणी आल्यानंतर पूर्णवेळ व पूर्णदाबाने पाणी मिळेल तरी याबाबत जनतेनेच आता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Contents
श्रीरामपूर | २५ नोव्हेंबर | सलीमखान पठाणPublic Issue शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गोंदवणी परिसरातील दोन्ही साठवण तलावातील पाणी जवळजवळ संपले असून सध्या तळामध्ये असलेल्या पाण्याचा पुरवठा शहरवासीयांना केला जातोय. कमी वेळ होणाऱ्या या पाण्यामध्ये दुर्गंधीचे प्रमाण खूप असून पाण्याचा रंग देखील बदलला आहे. लहान मुले उलटीजुलाबाने आजारी पडली आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय वेळेत न झाल्याने शहरातील नागरिकांवर दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची नामुष्की आल्याचे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील चर्चेतून दिसून आले.Public Issue काल दुपारी निळवंडे धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले असून ते उद्या सायंकाळपर्यंत तलावात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवसांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी माहिती नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता निलेश बकाल यांनी दिली.शहरातील सर्वच भागामध्ये नळांना दुर्गंधीयुक्त लालसर पाणी आले. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी पाण्याचे फोटो तसेच पाणी दुर्गंधीयुक्त असल्याचे पोस्ट टाकल्या. शहरातील सर्वच भागामध्ये Public Issue  असे पाणी आल्याने याबाबत पाणीपुरवठा विभागाचे निलेश बकाल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, तलावातील पाणीसाठा संपला. तळ्यातील पाणी सध्या सोडले जात आहे. त्यामध्ये निर्जंतुकी करण्यासाठी जी औषधे वापरली जातात त्याचे प्रमाण ठरलेले आहे. प्रमाणापेक्षा जास्त औषधे वापरल्यास नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागू नये म्हणून ती रिस्क आपण घेत नाही. आचारसंहितेमुळे पाणी सोडण्यास पाटबंधारे खात्याकडून उशीर झाला. परंतु काल दुपारी पाणी सोडण्यात आले ते उद्या संध्याकाळपर्यंत तलावात येईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे पूर्ण वेळ, पूर्ण दाबाने स्वच्छ पाणी पुरवठा होईल. याबाबत नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी देखील पाटबंधारे खात्याशी संपर्क साधून लवकरात लवकर पाणी सोडण्याची विनंती केली. दरम्यान दोन दिवसापासून शहरातील नळांना कुठे पिवळसर तर कुठे लालसर रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी नळामार्फत येत आहे. त्यामुळे लहान मुलांना बाधा होऊन उलट्या आणि जुलाबाचे पेशंट वाढले. काही नागरिक हे बॉक्समधील बाटलीबंद पाणी पीत आहेत. एखादी जलवाहिनी फुटून त्यामध्ये मातीमिश्रित पाणी गेले की काय अशी शंका व्यक्त केली जात होती परंतु पाणीपुरवठा विभागाशी संपर्क केल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली.नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याबाबत पाटबंधारे खात्याशी संपर्क ठेवून दोघांनी मिळून पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. रोटेशन लांबल्याने शहरवासीयांवर ही वेळ आली परंतु पिण्याच्या पाण्याला देखील जर आचारसंहितेचा बडगा दाखवला जात असेल तर ही दुर्दैवी बाब असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. भविष्यात शहरातील पाणीसाठा संपण्याअगोदरच तलावामध्ये पाटबंधारे खात्याने पाणी सोडावे, अशी मागणी देखील नागरिकांनी केली.दोन दिवस तलावातील तळ्यातील पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाणी उकळून प्यावे तसेच लहान मुलांची काळजी घ्यावी. नवीन पाणी आल्यानंतर पूर्णवेळ व पूर्णदाबाने पाणी मिळेल तरी याबाबत जनतेनेच आता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
Share This Article
Leave a comment