ठाणे | २५ नोव्हेंबर | गुरुदत्त वाकदेकर
Women महाराष्ट्रातील नावाजलेली मॅजिकल चारमंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसोबत प्रिंटमीडिया पार्टनर लोकमत आणि कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच यांना सोबत घेऊन “मणिकर्णिका २०२४” सन्मान सोहळा १९ नोव्हेंबर रोजी रोजी मुंबई येथे वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पार पडला. यामधे ‘मणिकर्णिका अवॉर्ड २०२४’ स्टार्टअप महिला उद्योजिका म्हणून मोहिनी पुजारी यांचा सन्मान करण्यात आला.
स्टे-फाइन फॅमिलीच्या ३ वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश आल्यामुळे कंपनीच्या संचालिका मोहिनी पूजारी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. ‘नारी प्रोटेक्ट ॲनिअन सॅनिटरी नॅपकिन’ ब्रांडमुळे हा मानाचा सन्मान मिळाला. एकूण २ हजार ८७० महिला नामांकनातून टॉप ३० महिला उद्योजिकांमध्ये समावेश होऊन ‘मणिकर्णिका अवार्ड २०२४’ स्टार्टअप Women उद्योजिका म्हणुन ‘प्रिन्स क्राऊन’ सोबत सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते पुजारी यांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात आपले मनोगत मांडताना मोहिनी पुजारी यांनी ‘मणिकर्णिका २०२४’ या सन्मानाबद्दल संपूर्ण स्टेफाईन फॅमिलीचे आभार मानले. आजपर्यंत एक लाखापेक्षा जास्त महिलांसाठी कॅन्सरमुक्त महिला, प्लास्टिकमुक्त सॅनिटरी नॅपकिन तसेच महिलांसाठी स्वावलंबी अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचता आले. जवळ-जवळ १५ हजारपेक्षा जास्त Women स्वयंव्यावसायिक बनविण्यात मोठे यश प्राप्त झाले. आपल्या या यशामध्ये सोबत काम करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुढे स्टेफाईनचे घोषवाक्य “स्टेफाईन की नारी, सब पे भारी” असे उदगार काढून त्यांनी यापुढे सुद्धा आपल्या सहकाऱ्यांसोबत अनेक शिखरे यशस्वीपणे गाठणार असल्याचे सूचक विधान केले. व्ही.केअर वेल्फेअर असोसिएशन सामाजिक संस्था असून गेल्या १३ वर्षापासून शैक्षणिक क्रीडा, बेरोजगारी, वैद्यकीय, अपंगत्व आणि समाजातील अनेक घटकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. गेल्या १३ वर्षात असोसिएशनने रुग्णांना वैद्यकीय मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय सुरू करून देणे आदी उपक्रम राबवित आहे.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर