Art कला संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल चित्रकला स्पर्धेत अहमदनगर शहरातील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अपूर्वा सागर नांदुरकर जिल्ह्यात प्रथम आली. अशोक भाऊ फिरोदिया विद्यालयात नुकतेच बाल चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस अपूर्वाला जिल्हा शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते देऊन तिचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी दरेकर, प्राचार्य प्रभाकर भाबड, शिक्षण विस्तार अधिकारी पवार, ढवळे, थोरात, चित्रकार अशोक डोळसे आदींसह मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिक्षण अधिकारी कडूस म्हणाले, पालक व कलाशिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या Art कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. कलेची आवड असलेल्या मुलांना त्यामुळे प्रोत्साहन मिळते. भविष्यात अहमदनगर मधील चांगले कलाकार तयार होतील.
या स्पर्धेसाठी अशोक डोळसे, सुजाता पायमोडे, सचिन घोडेसर, अनामिका म्हस्के, गुंजाळ सर आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. Art