Politics: दहशत करणाऱ्या 'पंटरां'ना हद्दपार करा - सचिन डफळ; मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस उपाधिक्षकांची भेट; मतदार, सामान्य माणूस भितीच्या छायेत - Rayat Samachar

Politics: दहशत करणाऱ्या ‘पंटरां’ना हद्दपार करा – सचिन डफळ; मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस उपाधिक्षकांची भेट; मतदार, सामान्य माणूस भितीच्या छायेत

रयत समाचार वृत्तसेवा
59 / 100

प्रतिनिधी | अहमदनगर

Politics अहमदनगर विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार, दहशत, दबावतंत्राचा वापर होणार असण्याची शक्यता आहे. शहरात असलेली गुंडगिरी, दहशत, अवैध व्यवसाय हे शहराचे लोकप्रतिनिधी यांचे कार्यकर्त्यांचे असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, दहशत, मारामारी, धमकावणे, जागा ताबेमारी, खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे व विविध अवैध व्यवसाय केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील काही जणांनी तडीपारीची शिक्षाही भोगलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ‘पंटरां’ना हद्दपार करण्याची मागणी मनसेच्या सचिन डफळ यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.

हे सर्वजण शहराच्या विद्यमान आमदारांसोबत निवडणुक प्रचाराचे काम करीत असून सर्वसामान्य लोकांमध्ये व व्यापारांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे. या गुन्हेगारांना राजाश्रय असल्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये मोठ्या घटना घडू शकतात. मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असून मनसेच्या कार्यकत्यांवरसुद्धा दबाव तसेच दहशतीचा वापर होऊ शकतो. एखा‌द्या कार्यकर्त्यांनी मोबाईलवर स्टेटस ठेवले तर लगेच त्याला धमकीचे फोन येतात. हे गुन्हेगार उजळमाथ्याने शहरात प्रचार करत फिरत असून त्यामुळे मतदारांवर मोठ्या प्रमाणात दहशत व दबाव निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिष्टमंडळात गजेंद्र राशिनकर, मनोज राऊत, तुषार हिरवे, अशोक दातरंगे, संदीप चौधरी, संकेत व्यवहारे आदींचा समावेश होता.

Share This Article
Leave a comment