Election: आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली ; ५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त - Rayat Samachar

Election: आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली ; ५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

रयत समाचार वृत्तसेवा
65 / 100

मुंबई | प्रतिनिधी

Election विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ हजार ३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

VIRAJ TRAVELS
Ad image
Share This Article
Leave a comment