Politics: बौद्ध युवक संघटनेचा भाऊसाहेब कांबळे यांना पाठिंबा - Rayat Samachar

Politics: बौद्ध युवक संघटनेचा भाऊसाहेब कांबळे यांना पाठिंबा

रयत समाचार वृत्तसेवा
65 / 100

श्रीरामपूर |१४ नोव्हेंबर | सागर भांड

Politics विधानसभेच्या निवडणुकीसाठी बौद्ध युवक संघटनेचा महायुतीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना जाहीर पाठिंबा असल्याचे संघटनेचे श्रीरामपूर तालुका युवक प्रमुख विकासभाऊ आमोलिक यांनी सांगितले.
श्रीरामपूर तालुक्याचा विकास व्हावा. त्याचबरोबर बौद्ध समाजाचे ‌प्रश्न सुटावेत. तालुक्याचा सर्वांगीण विकास यांसह विविध मागण्यासाठी पाठिंबा दिला असल्याचे आमोलिक यांनी म्हटले.
बौद्ध समाज भाऊसाहेब कांबळे यांच्या संपुर्ण पाठिमागे उभा असुन कांबळेच आमदार होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.

Share This Article
Leave a comment