Election: आर्थिक गैरप्रकार तक्रारींसाठी जिमाकाने केले हेल्पलाईन क्रमांक जाहिर - Rayat Samachar

Election: आर्थिक गैरप्रकार तक्रारींसाठी जिमाकाने केले हेल्पलाईन क्रमांक जाहिर

रयत समाचार वृत्तसेवा
65 / 100

अहमदनगर | १३ नोव्हेंबर | प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभा Election  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आचारसंहितेच्या काळात आर्थिक गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच तक्रारींसाठी जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर यांनी नागरीकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले.

संपर्क साधण्यासाठी प्राप्तिकर विभागाचा हेल्पलाइन क्रमांक १८००२२१५१० किंवा ८९७६१७६२७६, ८९७६१७६७७६ या क्रमांकांवर संपर्क करता येईल. शिवाय, cVIGIL मोबाइल ॲपवर तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मतदारांनी आर्थिक गैरप्रकारांच्या विरोधात पुढे येऊन माहिती पुरवावी, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली. तसेच कोणाकडेही ५०,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास योग्य स्रोत पुरावे सोबत ठेवावेत, अन्यथा ती रक्कम जप्त केली जाऊ शकते, असा इशारा ही त्यांनी दिला.

येत्या ता. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Share This Article
Leave a comment