अहमदनगर | १० नोव्हेंबर | प्रतिनिधी
विधानसभा Election अंतर्गत अहमदनगर शहर मतदारसंघात गृहमतदानासाठी सहमती दर्शविलेल्या १४३ मतदारांपैकी १३३ मतदारांनी गृहमतदान केले. उर्वरीत १० पैकी दोघांचा मृत्यू झाला असून ३ पुणे येथे रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांचे गृहमतदान होवू शकले नाही. इतर ५ मतदारांकडे मतदान पथक रविवारी जाणार आहे.
निवडणूक निरीक्षक ताई काये आणि Election निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी गृहमतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी सहा निवडणुक अधिकारी संजय शिंदे आणि समन्वयक अधिकारी सपना वसावा उपस्थित होते. ८५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी निवडणूक आयोगातर्फे ही सुविधा देण्यात आली.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर