अहमदनगर | ७ नोव्हेंबर | समीर मनियारी
येथील बाळासाहेब शंकर साळवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार Politics पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच साळवे यांना दिले. साळवे यांनी आजवर दिलेले योगदान लक्षात घेऊन, तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आणि ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीबद्दल साळवे यांचे शरद पवार, जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, मधुकर कदम, संजय मगर, चेतन गव्हाणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.