चिंचवड | २ नोव्हेंबर | प्रतिनिधी
येथील विधानसभा मतदारसंघात संभाजी ब्रिगेडसह विविध सामाजिक संघटनांची भूमिका किंग मेकरची ठरणार. पुरोगामी विचारांची ४० हजार मते या मतदारसंघात कार्यरत आहेत. या मतदारांपर्यंत सामाजिक चळवळींच्या विचारांचा वारसा जोपासणारे सतीश काळे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिवाय काळे मराठवाड्यातील असल्यामुळे येथील मतदारांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतो. त्यामुळे ‘स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेने’चे उमेदवार असलेल्या सतीश काळे यांची मते प्रस्थापित स्थानिक नेतृत्वांना त्रासदायक Politics ठरणार आहेत.
चिंचवड विधानसभा Politics निवडणुकीसाठी प्रस्थापित प्रमुख पक्ष्यांचे उमेदवार उभे आहेत. त्यांना इतरही पक्षाकडून आव्हान दिले जात आहे. तर अपक्ष उमेदवारी देखील भरून अनेकांनी त्यांना आव्हान दिले आहे. सामाजिक संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे हे गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक काळ सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा असे विविध कार्यक्रम राबविण्यावर त्यांचा भर आहे. शिवराय, शाह, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा ते जोपासत आहेत. सामाजिक कृतीला राजकीय जोड असल्यास अनेक विकासकामे मार्गी लागतात. या उद्देशाने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेच्या वतीने दाखल केला आहे.
काळे यांच्या उमेदवारीने प्रस्थापित पक्षातील प्रमुख उमेदवारांना फटका बसणार अशी चर्चा आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार जोपासणारे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. सुमारे ४० हजार मतदार या विचारांचे आहेत. सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत केवळ मतदानासाठी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचा वापर केला असल्याची खदखद आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षाऐवजी इतर उमेदवारांना सहकार्याची भूमिका पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे सतीश काळे यांना चिंचवडमधून मोठे मताधिक्य मिळेल अशी शक्यता आहे.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर