Police Medal येथील शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ जाहीर करण्यात आले. संदीप मिटके यांनी अहमदनगर शहर, आर्थिक गुन्हे शाखा, श्रीरामपूर, शिर्डी, शेवगाव येथे सकारात्मक काम केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गुंतागुंतीच्या, संवेदनशील आणि क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली. यामधे त्यांचा मोठा वाटा राहिला.
श्रीरामपूर येथील संवेदनशील गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासासाठी त्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ जाहीर झाले आहे. कोविडकाळात अहमदनगर शहरात त्यांनी पोलिसी जबाबदारीच्या पुढे जाऊन गरजू नागरिकांना प्रत्यक्ष मदतीचे काम केले. एमआयडीसीमधील अनेक कामगार व त्यांच्या कुटुंबियांना बेरोजगार होण्यापासून वाचविले होते. कामगारांना प्रत्यक्ष मदत केली होती. शेवगाव दंगल कौशल्याने हाताळून आरोपी जेरबंद केले. शिर्डी येथील वेश्या व्यवसायाची पाळेमुळे उखडून टाकण्यात त्यांचे मोठे योगदान होते. यापूर्वीही त्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह गौरविण्यात आले.
एसीपी मिटके यांच्यासह राज्यातील अकरा अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले. एसीपी मिटके यांचा अहमदनगर नाशिकसह राज्यमधून अभिनंदन होत आहे.