Rip News: मुरब्बी राजकारणी कैलास खजिनदार यांचे निधन; २७ नोव्हेंबर रोजी दशक्रिया विधी - Rayat Samachar
Ad image

Rip News: मुरब्बी राजकारणी कैलास खजिनदार यांचे निधन; २७ नोव्हेंबर रोजी दशक्रिया विधी

69 / 100

देहरे | २३ ऑक्टोबर | राहुल जाधव

Rip News नगर तालुक्यातील देहरे येथील रहिवासी कैलास कुंडलिक खजिनदार यांचे शुक्रवारी ता.१८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते देहरे १९९५ ते २००० दरम्यान ग्रामपंचायत सदस्य होते. माजी खासदार कै. दादा पाटील शेळके यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

देहरे गावचे पोलीस पाटील व जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत खजिनदार यांचे ते चुलते होते. त्यांच्या जाण्याने देहरे परिसरात सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. Rip News

त्यांचा दशक्रिया विधी रविवारी ता.२७ नोव्हेंबर २०२४ रोजी देहरे येथे होणार आहे. देहरे परिसरातील ग्रामस्थांकडून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment