गोवा | ११ ऑक्टोबर | प्रभाकर ढगे
Women दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना २०२४ सालचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या काव्यात्मक गद्यासाठी हा सन्मान देण्यात आला. ‘द व्हेजिटेरियन, द व्हाईट बुक, ह्युमन अॕक्ट्स, द व्हाईट बूक आणि ग्रीक लेसन ही त्यांची काही पुस्तके आहेत.
हान कांगचा जन्म १९७० मध्ये दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू शहरात झाला. ५३ वर्षीय हान कांग या साहित्यिक कुटुंबातील आहेत. त्यांचे वडीलही प्रसिद्ध कादंबरीकार आहेत.
नोबेल समितीच्या म्हणण्यानुसार, हा सन्मान हान कांग यांना त्यांच्या “ऐतिहासिक आघात आणि मानवी जीवनाच्या नाजूकपणावर प्रकाश टाकणाऱ्या प्रगल्भ काव्यात्मक गद्यासाठी” हा पुरस्कार देण्यात येत आहे. ‘द व्हेजिटेरियन’ कादंबरी म्हणजे कोरियन समाजातील पितृसत्ताक दडपशाही आणि महिलांच्या प्रतिकाराचे विध्वंसक चित्रण आहे. हान कांगचे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा