श्रीरामपुर |६ ऑक्टोबर | शफीक बागवान
ahmednagar news माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोपरगाव येथील साई संजीवनी बँकेस सलग दहाव्यांदा युनिट बँका व तीनशे कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँक गटात राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा सर्वोकृष्ट बँक पुरस्कार नुकताच पुणे येथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मिळाल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.
अडचणींतुन मार्ग काढत साई संजीवनी बँकेने ३०० कोटी रूपयांपर्यंत ठेवी असणाऱ्या गटात स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन दरवर्षी राज्यभरातील सहकारी बँकींग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या सभासद नागरी सहकारी बँकांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना पुरस्कार प्रदान करत असते. संचालक, सर्व ठेवीदार, सभासद, शेतकरी, हितचिंतक यांनी बँक कारभारावर दाखविलेल्या अढळ विश्वासामुळेच बँकेस हा पुरस्कार मिळाल्याचे विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दुरदृष्टीकोनातुन सहकारी साखर कारखानदारी बरोबरच आर्थिक पतपुरवठ्यासाठी साईसंजीवनी को. ऑपरेटीव्ह बँकेची स्थापना केली. त्यातुन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत शेती फुलवत अनेक नवउद्योजकांना कर्ज पुरवठा केलेला आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष शरद थोरात, उपाध्यक्ष जयंतीलाल पटेल, सर्व संचालक मंडळाचा कारभार गौरवास्पद असल्याचे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष रमाकांत खेतान, अर्थतज्ञ व सहकार क्षेत्रातील अन्य मान्यवरांच्या हस्ते गणेशखिंड पुणे येथे पुरस्कार प्रदान करण्यांत आला.
साई संजीवनीचे उपाध्यक्ष जयंतीलाल पटेल, संचालक नानासाहेब गव्हाणे, बाळासाहेब निकोले, सुरेश जाधव, रामदास देवकर, कचेश्वर माळी, दिलीप बनकर, माधव गोसावी, विधीज्ञ अशोकराव टुपके, सोपानराव चिने, मुख्य सर व्यवस्थापक पदमाकर सभारंजक, यांच्यासह सर्व सभासद, विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी स्विकारला.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा