जामखेड | ५ ऑक्टोबर | रिजवान शेख
Politics आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ.रोहित पवार यांच्या विकासकामांवर चर्चा आणि संवाद घडावा तसेच सामाजिक सेवा घडावी या उद्देशाने स्वाभिमानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जामखेड तालुक्यात ‘स्वाभिमान यात्रा’ काढली असून चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करुन ‘स्वाभिमान यात्रे’चा प्रारंभ झाला.
यात्रेच्या पहिल्या दिवशी आ. पवार यांच्या आई सुनंदाताई पवार यांनी स्वाभिमान यात्रेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. पुढील काही दिवस ही यात्रा जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन ग्रामदैवताच्या परिसरात स्वच्छता आणि वृक्षारोपण करणार आहेत.
यात्रेदरम्यान पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये मुक्काम करून विविध सामाजिक उपक्रम घेणार आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम तसेच जनसंवाद आदी उपक्रम राबवणार. यात्रेच्या पहिल्या दिवशी चौंडी, हळगाव, गोयकरवाडी, आधी, मतेवाडी, जवळा ही गावे घेण्यात आली. गावांमध्ये स्वाभिमान यात्रेचे विविध समाजघटकांकडून स्वागत करण्यात आले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा